भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां भीत नाहीं देवा । आदि अंत तुझा ठावा

atan bhit nahin deva | adi ant tujha thava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां भीत नाहीं देवा । आदि अंत तुझा ठावा ॥१॥ झालें नामाचेनि बळकट । तेणें बैकुंठ पायवाट ॥२॥ ज्ञान वैराग्य विवेक बळें । तें तंव अम्हांसवें खेळे ॥३॥ दया क्षमा आम्हांपुढें । जनी म्हणे झाले वेडे ॥४॥