भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि ईंद्रियें सकळ

asoni indriyen sakal

रचनाकार: संत रामदास · अभंग
असोनि ईंद्रियें सकळ। काय करावीं निष्फळ नाहीं कथा निरुपण। तेंचि बधिर श्रवण नाहीं देवाचें वर्णन । तें गे तेंचि मुकेपण नाहीं पाहिलें देवासी । अंध म्हणावें तयासी नाहीं उपकारा लाविले। तें गे तेचि हात लुले केले नाही तीर्थाटण। व्यर्थ गेले करचरण काया नाहीं झिजविली। प्रेतरुपचि उरली दास म्हणे भक्तिविण । अवघे देह कुलक्षण।