भजनी मालिका
← भजनांकडे परत

आसनीं शयनीं जपतां चक्रपाणि । लाविली निशाणी वैकुंठींची

asanin shayanin japatan chakrapani | lavili nishani vaikunthinchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आसनीं शयनीं जपतां चक्रपाणि । लाविली निशाणी वैकुंठींची ॥१॥ नाहीं रे बंधन आम्हां हरिभक्तां । गीतीं गुण गातां राघोबाचि ॥२॥ भवसिंधूची जिवा जाली पायवाट । जे गर्जती उद्धट नामघोष ॥३॥ प्रेमें वोथरत हर्षे पिटूं टाळी । नाम ह्रदयकमळीं विठोबाचें ॥४॥ नाहीं काया क्लेश न करी सायास । दृढ धरी विश्वास हरीनामीं ॥५॥ नामा म्हणे साधन न लगे अनेक । दिली मज भाक पांडुरंगें ॥६॥