भजनी मालिका
← भजनांकडे परत

आसनीं शयनीं भोजनीं गमनीं । तुझे पाय दोन्ही दावी मज

asanin shayanin bhojanin gamanin | tujhe pay donhi davi maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आसनीं शयनीं भोजनीं गमनीं । तुझे पाय दोन्ही दावी मज ॥१॥ संसार कल्मष समूळ छेदिसी । दावीं अहर्निशीं पाय मज ॥२॥ हरी ध्यानीं मनीं भक्तां तूं परेशा । अनाथ कोंवसा गोंवळियां ॥३॥ नामा म्हणे नाम ऐकों सर्वोत्तमा । संसारींच्या श्रमा वारीं देवा ॥४॥