भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरूप रूपासी आलें । परब्रह्म ठसावलें । भक्ता पुंड-लिका फावलें । गौप्य झालें प्रगट

arup rupasi alen | parabrahma thasavalen | bhakta pund-lika phavalen | gaupya jhalen pragat

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अरूप रूपासी आलें । परब्रह्म ठसावलें । भक्ता पुंड-लिका फावलें । गौप्य झालें प्रगट ॥१॥ धन्य धन्य भिंवरातट । चंद्रभागा हे निकाट । धन्य धन्य वाळूवंट । मुक्तिपेठ पंढरी ॥२॥ धन्य धन्य प्रेमळ । सबराभरित स्वानंद जळ । स्नान केलिया नि-र्मळ । कोटिकुळें उद्धरती ॥३॥ धन्य गा हा देशु । जेथें विठ्ठले केला रहिवासु । नामा विनवी विष्णुदासु । देह समरसु भक्तीचा ॥४॥