भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्थ जाणती अनुभवी । खूण ठावीं जयां ते

artha janati anubhavi | khun thavin jayan te

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अर्थ जाणती अनुभवी । खूण ठावीं जयां ते ॥१॥ संतकृपेचि ते जाति । कवणे रिती ते कैसी ॥२॥ कळे त्या खरें खोटें । धीट पाटे प्रासादिक ॥३॥ निळा म्हणे अंतरींचें । प्रेम साचें कीं लटिकें ॥४॥