भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया

are vithaya vithaya | mul mayechya karataya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया ॥१॥ तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥ तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे ॥३॥ उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी ॥४॥