भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे स्वरुपाकारणें विश्वरुप घेतलें

are svarupakaranen vishvarup ghetalen

अरे स्वरुपाकारणें विश्वरुप घेतलें । सगुणें झाकिलें निर्गुण रया ॥१॥ तत्त्वीं तत्त्व कवळी उगवे रवीमंडळी । अवघीच झांकोळी अपल्या तेजें ॥२॥ द्रष्टाचिये दीप्तीं दृश्यचि न दिसे । समरसीं भासे तेज त्याचें ॥३॥ चित्स्वरुपीं नांदे चित्स्वरुपीं भासे । ॐकारासरिसें तदाकार ॥४॥ प्रेमकळीं ओतले सप्रमळीत तेज । तेथें तूं विराजे ज्ञानदेवा ॥५॥