भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे अरे ज्ञाना झालासि पावन

are are dnyana jhalasi pavan

अरे अरे ज्ञाना झालासि पावन । तुझें तुज ध्यान कळों आलें ॥१॥ तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फ़िटला संदेह अन्यतत्त्वीं ॥२॥ मुरडूनियां मन उपजलासि चित्तें । कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥ दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥ वृत्तीची निवृत्ति आपणासकट । अवघेंची वैकुंठ चतुर्भुज ॥५॥ निवृत्ति परमअनुभव नेमा । शांति पूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥