भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे अरे ज्ञाना ज्ञान उघडे बोलसी

are are dnyana dnyan ughade bolasi

अरे अरे ज्ञाना ज्ञान उघडे बोलसी । तुझा तूंचि होशी हरि ऐसा ॥१॥ आपुलें तें झाकी पर तें दावी । पंश्यतिये भावीं मध्यमे राहे ॥२॥ तत्त्व तेंचि धरी रजो गुण चारी । पंचमा आचारी सांपडती ॥३॥ षड्रसीं भोक्ता हरिरुप करी । सप्तमा जिव्हारीं कळा धरी ॥४॥ अष्टमा अष्टसिध्दि अष्टांग नेमेशीं । तें जीवेंभावेंसी तूंचि होसी ॥५॥ नवमा नवमी दशमावृत्ती । एकादशीं तृप्ती करी ज्ञाना ॥६॥ ऐसा तूं एकादश होई तूंरे ज्ञाना । द्वादशीच्या चिन्हा सांगों तुज ॥७॥ निवृत्ति द्वादशगुरुवचनीं भाष्य एकविध कास घाली ज्ञाना ॥८॥