भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिये खुणें आपणपे दावी

apuliye khunen apanape davi

आपुलिये खुणें आपणपे दावी । कीं सगुणबुंथी चोख मदवी । ऐसा सुंदर गोपवेष । कीं तत्त्वमस्यादि सौरसु जेथें श्रुति नेति नेति ठेल्या पायीं । तो तूं सगुण निर्गुणी निजानंदें सहजचि कळे विदेहीं रया ॥१॥ एक म्हणतां दुजे नाहीरे तेथें शून्य तूं सांगसी काई । निरशून्य तें आतां सगुण ते निराळलें तेथें हे कल्पना काई रया ॥२॥ नामरुपछंद गोडी ऐसी इंद्रियांची आवडी । परतोनि पाहे घडिघडी तोचि तूं ॥ तेथें आठऊ ना विसरु । परी तोचि गा तूं थोरु ऐसा निर्धाराचा धीरु धरी ॥ ऐसें जाणोनिया जरी सांडी मांडी करिसी । तरी पावसी कोण येरझारी रया ॥३॥ तोचि तूं जगदात्मा विसावा घडि क्षण न विसंबावा । हाचि होऊनि रहावा प्राण माझा ॥ म्हणोनि धीरु धीरु बापरखुमादेविवरा विठ्ठला आतां । प्रपंचीं न गुंते साचे आम्हा जितांचि मरणें कां मेलिया कल्पकोडी जिणें धरि या निवृत्तिची आंत रया ॥४॥