भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलें तुम्हीं न संडावें । कर्म स्वाभावें आहे तें

apulen tumhin na sandaven | karma svabhaven ahe ten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आपुलें तुम्हीं न संडावें । कर्म स्वाभावें आहे तें ॥१॥ सांभाळावें नामधरका । निरसुनी पातका भेटी दयावी ॥२॥ सूर्य न संडी प्रकाश जेवीं । रक्षी पदवी जे आहे ॥३॥ निळा म्हणे त्यापरी देवा । आमुचा करावा प्रतिपक्ष ॥४॥