भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपराधी आहे मोठा

aparadhi ahe motha

रचनाकार: संत रामदास · अभंग
अपराधी आहे मोठा। मारणें कृपेचा सोटा गुरुराज सुखाचे कंद । नेणुनि केला हा निजछंद । तेणें पावलों मी बंध । जालों निंद्य सर्वस्वीं तारीं तारीं सद्गुरुराया । वारीं माझे तापत्रया । तुझे पाय काशी गया । आहे मजला सर्वस्वीं आतां अंत पाहसी काय । तूंचि माझा बापमाय। रामदास तुझे पाय । वारंवार वंदितो