भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा

aparadhachya kodi hechi majhi jodi | patitapavan praudhi tujhi deva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥ माझिया निदैवें ऐसेंचि घडलें । तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥ सहस्त्र अपराध घालीं माझें पोटीं । तारीं जगजेठी नामा म्हणे ॥३॥