भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुपम्य मनोहर

anupamya manohar

अनुपम्य मनोहर ।कांसे शोभे पितांबर । चरणीं ब्रिदाचा तोडर ।देखिला देवो ॥१॥ योगियांची कसवटी ।दावितसे नेत्रपुटीं । उभा भीवरेच्या तटीं ।देखिला देवो ॥२॥ बापरखुमादेविवरू । पुंडलिका अभयकरू । परब्रह्म साहाकारू । देखिला देवो ॥३॥