भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभव रहणीविण कायसें श्रवण

anubhav rahanivin kayasen shravan

अनुभव रहणीविण कायसें श्रवण । गर्भ अंधु नेंणें रत्नाकिरण ॥१॥ गेले मेले काय सांगाल गोष्टीं । स्वयें आत्मज्ञानी घाली परमात्मीं मिठी ॥२॥ जीवा जीवन अंतरी बाहेजु निर्धारी । सर्व निरंतरी पूर्ण भरित ॥३॥ बाह्यजु प्रवृत्ति अंतरी निवृत्ति । उभयतां गति एक आहे ॥४॥ प्रसूतिकाळीं व्याली वांझ आपत्यजवळी । वांझ क्रीडा विनोदें रळि खेळतसे ॥५॥ अनुभव रहणीविण जाला भगवा दिगांबरु । जैसा नग्नवरु हिंडे हाटाबिदीं ॥६॥ तीर्थक्षेत्र व्रत दान यागादिक साधन । सगुण निर्गुण पाहीं या दोहोमाजि होऊनि राही । तरी निवसि ठाईच ठायीं अरे जना ॥८॥ सगुण निर्गुण पाहीं जया पासोनि । ते राहे अनुभउनि येर वाउगेचि रया ॥९॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलेंसि एकांतु । द्वैताद्वैताची मातु उरेचिना ॥१०॥