भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभव जाला प्रंपच बुडाला

anubhav jala prampach budala

अनुभव जाला प्रंपच बुडाला । आपुला आपण देखिला सोहळावो माये ॥१॥ आपण जाणतां आपण मी जालिये । आपणापैं विसरलिये नेहटीं वो माये ॥२॥ आपुला म्हणोनि अवघा आलिंगिला । अवघा देखिला अवघेपणें वो माये ॥३॥ ऐसे जाणोनि ठकलें ठकोनियां ठेलें । रखुमादेविवरेविठ्ठलें वो माये ॥४॥