भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म । उघडे अध्यात्म बोलियेलें

anubhav ha sagar guhya ani brahma | ughade adhyatma boliyelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म । उघडे अध्यात्म बोलियेलें ॥१॥ प्रगट हें गुह्य उकलिलें गाबाळ । केलें करतळमळ ज्ञानयानें ॥२॥ कोणाची कल्पना नुरेचि बा येथें । उघडा गुह्यार्थ सिद्ध केला ॥३॥ करणें न करणें सांगितला पंथ । तिहीं लोकीं कीर्त वाढविली ॥४॥ ज्ञान हें अंजन साधी संजीवनी । नामा म्हणे यांनीं ख्याती केली ॥५॥