भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरींचे मनोगत । तुम्ही तों सतत जाणतसां

antarinche manogat | tumhi ton satat janatasan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अंतरींचे मनोगत । तुम्ही तों सतत जाणतसां ॥१॥ तरी वियोग नका आतां । तुमच्या भजना भजनासी ॥२॥ आठव करितां दिवसरात्री । उल्हास चित्तीं मना दयावा ॥३॥ निळा म्हणे कृपाघना । विज्ञापना हे माझी ॥४॥