भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंजनी संपूर्ण ठेऊनियां जन

anjani sampurna theuniyan jan

अंजनी संपूर्ण ठेऊनियां जन । ज्ञानी ज्ञानघन निरालंबीं ॥१॥ आदि मध्य आंतु दिसोनियां दिसे । पाठीं पोटीं दिसे निघोट रया ॥२॥ श्रवणनयन जातिगोतपूर्ण । जीवशिवा खुण आसपणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें वाच्य वाचक योगें । हरिविण वाउगें नाहीं रया ॥४॥