भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंजनाचें अंजन सदोदीत पाहिलें

anjanachen anjan sadodit pahilen

अंजनाचें अंजन सदोदीत पाहिलें । पाहाणें होऊनी ठेलें सर्वाठायीं ॥१॥ आतां बोलाबोली नको बा आणिक । बिंदु तो नि:शंक ब्रह्म रया ॥२॥ अनुहात उन्मनी म्हणोनी व्यर्थ काय । मुखीं धरी सोय ब्रह्मरंध्री ॥३॥ ज्ञानदेव म्हणे न बोले आणिक । डोळीयांची वाल पाहतांची ॥४॥