भजनी मालिका
← भजनांकडे परत

अणिमादि सिद्धि जयाचिया दासी । उणें तयापासीं काय आहे

animadi siddhi jayachiya dasi | unen tayapasin kay ahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अणिमादि सिद्धि जयाचिया दासी । उणें तयापासीं काय आहे ॥१॥ आणिकाचे द्वारीं सांडोवा पैं होसी । धिग्‍ धिग्‍ न लाजसी असे जना ॥२॥ सुलभ सोपारा सेवा माझा स्वामी । म्ह-णतां जोडे नामीं एक वाचे ॥३॥ अजामेळ वैकुंठा एक नेला नामें । मणिका विमानें स्वयें नेली ॥४॥ ऐसा हा कृपाळु आसनीं शयनीं । न विसंबावा मनीं भाग्यवंतीं ॥५॥ जटायु पक्षियाचें स्वयें झाला लेंकरूं । त्याचा क्रियापारु केला रामें ॥६॥ शबरीचीं फळें उच्छि ष्टेंही खाय । ना विसरती पाय कैसे प्राणी ॥७॥ शाहाणिया द्वार-पाळ ह्मणतां लाज थोरी । जरी झाला भिकारी न पाहे ॥८॥ तो बळीचा द्वारपाळु सारथी पार्थाचा । तो गोसावी आमुचा देवराणा ॥९॥ गर्भवास तया न होती रे जना । म्हणोनि लोक भजना प्रवर्तले ॥१०॥ अंबऋषिराया सांपडले सायास । साहिला गर्भवास सकळ देवें ॥११॥ उच्छिष्ट होंचि खातां प्रायश्चित्त असे । तो गोपाळाचे कैसें खाय हरी ॥१२॥ त्या सुखा सुरवर जन्म इच्छिताती । म्यां अ सा लक्ष्मीपति कां न सेवावा ॥१३॥ म्हणोनि सोइरा आन दुजा नाहीं । गुरुपिता पाहीं हाचि बंधु ॥१४॥ सज्जन सांगती अनेक नाही आह्मां । कीर्ति वर्णी नामा होऊनि भाट ॥१५॥