भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकही उदंड संतजन । राहिले व्यापून महीतळीं

anikahi udand santajan | rahile vyapun mahitalin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आणिकही उदंड संतजन । राहिले व्यापून महीतळीं ॥१॥ नामेंचि पावन केलें दोषी । उध्दार आणिकांशीं करुनियां ॥२॥ गर्जती तेणें ब्रम्हानंदे । हरिनाम पदें आळविती ॥३॥ निळा म्हणे निमग्न झालें । हरिपदा पावलें हरिनामें ॥४॥