भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंधकारीं प्रकाश दावी । दिप रवीपुढें मिथ्या

andhakarin prakash davi | dip ravipudhen mithya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अंधकारीं प्रकाश दावी । दिप रवीपुढें मिथ्या ॥१॥ तैशीं प्राप्तापुढें ज्ञानें । युक्तिचीं दिनें लेवासे ॥२॥ जिवे मेवे गोडिये निके । परि ते फिके परमामृतीं ॥३॥ निळा म्हणे दाविती भाव । परि ते स्वमेव संत भिन्न ॥४॥