भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथासी साह्म होसी नारायणा । करुणावचना बोलविसी

anathasi sahma hosi narayana | karunavachana bolavisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनाथासी साह्म होसी नारायणा । करुणावचना बोलविसी ॥१॥ पांडुरंगा कृपा करीं मजवरी । पामर उद्धरीं पाहतांची ॥२॥ गणिकें सत्वर मोक्षपद देसी । उपमन्यु बाळासी क्षीरसिंधु ॥३॥ नामा म्हणे याति विचारसी । कण्य घरीं खासी विदुराच्या ॥४॥