भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें

anath anath mhanati maten | anathanath mhanati tuten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें ॥१॥ आपुलें ब्रीद साच करी । येक वेळा भेटी दे गा मुरारी ॥२॥ पतित पतित म्हणती मातें । पतितपावन म्हणती तूतें ॥३॥ नामा म्हणे ऐकें सुजान । नाइकसि तरि लाज कवणा ॥४॥