भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत तीर्थांचें माहेर । अनंत रूपांचें सार । अनंता अ-नंत अपार । तो हा कटीं कर ठेवूनि उभा

anant tirthanchen maher | anant rupanchen sar | ananta a-nant apar | to ha katin kar thevuni ubha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनंत तीर्थांचें माहेर । अनंत रूपांचें सार । अनंता अ-नंत अपार । तो हा कटीं कर ठेवूनि उभा ॥१॥ धन्य धन्य पांडु-रंग । सकळ दोषां होय भंग । पूर्वज उद्धरती सांग । पंढरपुर देखिलिया ॥२॥ निरा भिवरा पडतां दृष्टी । स्नान करितां शुद्ध सृष्टि । अंतीं तों वैकुंठप्राप्ती । ऐसें परमेष्टि बोलिला ॥३॥ तेथें एक शीत दिधल्या अन्न । कोटी कुळांचें होय उद्धरण । कोटि याग केले पूर्ण । ऐसें महिमान ये तीर्थींचें ॥४॥ नामा ह्मणे धन्य जन्म । जे धरिती पंढरीचा नेम । तयां अंतीं पुरुषोत्तम । जीवें भावे न विसंबे ॥५॥