भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत जन्में मेळविता दुर्लभ । तो प्राणवल्लभ शंकराचा

anant janmen melavita durlabh | to pranavallabh shankaracha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनंत जन्में मेळविता दुर्लभ । तो प्राणवल्लभ शंकराचा ॥१॥ वेदशास्त्र मंथुनी काढियेलें सार । ब्रह्मादिकां पार रामनामें ॥२॥ स्वर्गींचे देव चिंतिताती मानसीं । भेटी आम्हां कैसी पांडुरंगीं ॥३॥ नामा म्हणे केशवाचें नाम उच्चारितां । विघ्नासी भंगिता नवल काय ॥४॥