भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुच्या स्वस्थानीं नाहीं पां अंधार । अवघीं चराचर प्रकाशत्वें

amuchya svasthanin nahin pan andhar | avaghin charachar prakashatven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आमुच्या स्वस्थानीं नाहीं पां अंधार । अवघीं चराचर प्रकाशत्वें ॥१॥ उदयु आणि अस्तु नाहीं स्वरूपासी । ऐसें मुनि ऋषि जाणताती ॥२॥ आम्हीं कधीं आलों स्वरूप सोडोन । जावें पालटोन जेथिल तेथें ॥३॥ अंतर बाहेर स्वामीचें स्वरूप । स्वयें नंदादीप उजळिला ॥४॥ वद्य वैशाखमासीं दशमीचे दिवशीं । गेले ते स्नानासी तापीतीरीं ॥५॥ नामा म्हणे गोविंदा मनोहर पद्‌‍मनाभा । अंकुरला गाभा विराटाचा ॥६॥