भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचें ठेवणें जुगादीचें नाणें । जातां नामथानें सांगितलें

amuchen thevanen jugadichen nanen | jatan namathanen sangitalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आमुचें ठेवणें जुगादीचें नाणें । जातां नामथानें सांगितलें ॥१॥ इतके दिवस पाहिली तुझी वाट । परि तूं उदास न बोलसी ॥२॥ तुजवांचोनी आम्हां कोण असे पोशिता । देईं कृपावंता नामप्रेम ॥३॥ आम्ही तुझीं सेवकें रंकाहुनी रंक । कठीण बोलणें निकें वदें तुज ॥४॥ म्हणोनी वेळोवेळां लागें तुझ्या पायीं । लटकीच गोबाई करूं नको ॥५॥ तुज आम्हासी वेगळीक नाहीं । तरी तूं न धरीं कांहीं दुजामाव ॥६॥ आपुलें म्हणावें अंधारीं ओळखावें । नामप्रेम यावें म्हणे विठा ॥७॥