भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचा बाप आम्हां सांगे । भाक दिघली पांडुरंगें

amucha bap amhan sange | bhak dighali pandurangen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आमुचा बाप आम्हां सांगे । भाक दिघली पांडुरंगें ॥१॥ तुम्हां न विसंबे सर्वथा । तुमचा भार माझ्या माथां ॥२॥ करीन तळहात साउली । तुमची अवघी वशावळी ॥३॥ विठा म्हणे विसरलासी । आम्हां शब्दीं न पुससी ॥४॥