भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं कापडीरे आम्ही कापडीरे । पापें बारा ताटा पळती बापडिरे

amhin kapadire amhi kapadire | papen bara tata palati bapadire

आम्हीं कापडीरे आम्ही कापडीरे । पापें बारा ताटा पळती बापडिरे ॥१॥ पंढरपुरीचे कापडिरे । उत्तरपंथीचे कापडिरे ॥२॥ आणि पाहालेरे । संतसंगति सुख जालेरे ॥३॥ समता कावडिरे समता कावडिरे । माजि नामामृत भरिलें आवडिरे ॥४॥ येणें न घडेरे जाणे न घडेरे निजसुख कोंदलें पाहातां चहूंकडेरे ॥५॥ नलगे दंडणेरे नलगे मुंडणेरे । नाम म्हणोनि कर्माकर्मखंडणेरे ॥६॥ दु:ख फिटलेरे । दु:ख फिटलेरे बापरखुमादेविवर विठ्ठलरे ॥७॥