भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही काय जाणों तुझा अंतपार । होसी निरंतर निवारिता

amhi kay janon tujha antapar | hosi nirantar nivarita

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्ही काय जाणों तुझा अंतपार । होसी निरंतर निवारिता ॥१॥ बहु अपराधी जाणा यातिहीन । पतितपावना तुम्ही देवा ॥२॥ नामा म्हणे ऐसा पातकी पामर । करिसी उद्धारा साच ब्रीदें ॥३॥