भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंबुला विकून घेतली वस्तु

ambula vikun ghetali vastu

अंबुला विकून घेतली वस्तु । घराचार समस्तु बुडविला ॥१॥ उठोनि गेलिये अज्ञान म्हणाल । म्यां तंव कैवल्य जोडियेलें ॥२॥ अंबुला सांडूनि परावा केला । संसार सांडिला काय सांगों ॥३॥ रखुमादेविवरें मज पर्णुनि नेलें । सुखचि दिधलें काय सांगों ॥४॥