भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंबुला होता तो लेंकरु जाला

ambula hota to lenkaru jala

अंबुला होता तो लेंकरु जाला । घराचार बुडाला बाईंयांनो ॥१॥ झणी अकुळी म्हणाल उणें । तुम्ही जाणते जाणा परमार्थ खुणें ॥२॥ रखुमादेविवरें विठ्ठलें भोगिलिये । लंपट जाहालिये सहजानंदीं ॥३॥