भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन

amachin tin rupen disatat don

रचनाकार: संत संताजी · अभंग
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन । परि पाहीँ मन सारखेच ।। नावाच्या अक्षरांची करितां ताडातोडी । परि तेही जोडी होय पून्हां ।। संतु म्हणे ह्याचे कारण तेँ कांही । शोधुनियां पाहीँ ग्रंथांतरी ।।