भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिया ब्राह्मणासी दान द्रव्य दिधलें अपार जाण

aliya brahmanasi dan dravya didhalen apar jan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आलिया ब्राह्मणासी दान द्रव्य दिधलें अपार जाण ॥१॥ गाईम्हसीची खिल्लारें । ब्राह्मणा दिली अपारें ।।२।। कामधेनूची उभनी कल्पवृक्षाची दाटणी।।३।। ऐसा आनंदसोहळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥