भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड तमासा डोळा देख निका

akhand tamasa dola dekh nika

अखंड तमासा डोळा देख निका । काळा निळा परिवा बाईयानो ॥१॥ सदोदीत नयनीं नयन हारपे । निळ्याचे स्वरुपें मनीं वसो ॥२॥ अकरा वेगळें नाहीं बा आणिक । माझे नेत्रीं देख शुध्द ज्योती ॥३॥ ज्ञानोबाची वाणी पूर्ण रुपी घ्यावी । देहींच पाहावी आत्मज्योती ॥४॥