भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड हरि वाचेसी

akhand hari vachesi

अखंड हरि वाचेसी । जरी सुकॄताची राशी । तरीच हरि ये मुखासी । धन्य जन्मासी तो आला ॥१॥ देखता ज्याचे चरण । यम जातसे शरण । ऐसें सुकृताचें वर्णन । कवणे करावें तयाचें ॥२॥ तोचि एक साधु देखा । नित्य पुसावें त्या विवेका । तो कांहीं न धरी शंका । हरिनाम म्हणतसे ॥३॥ ज्ञानदेवी निजसूत्र । तोचि धन्य शुध्द पवित्र । हरिवांचूनि त्याचें वक्र । नेणें आणिक दुसरें ॥४॥