भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाशीं पुष्पक भुभ्र दंडा दिसे । बैसोनि येतसे ज्ञानदेव

akashin pushpak bhubhra danda dise | baisoni yetase dnyanadev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आकाशीं पुष्पक भुभ्र दंडा दिसे । बैसोनि येतसे ज्ञानदेव ॥१॥ शुद्धभावें इच्छी ज्ञानदेव भेटी । येई उठाउठी भेटूं त्यासी ॥२॥ पहाती नवल भक्त ते प्रेमळ । विश्चय निश्चय निढळ आहे ज्यांचा ॥३॥ देव म्हणे नाम्या घेई भेटीसुखा । ज्ञानदेव सखा उभा येथें ॥४॥