भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाशाचा शेंडा कमळ निराळें

akashacha shenda kamal niralen

आकाशाचा शेंडा कमळ निराळें । त्यासी चार दळें शोभताती ॥१॥ औट हात एक अंगुष्ठ दुसरें । पर्वार्ध मसुरे प्रमाण हें ॥२॥ रक्त श्वेत शाम निळवर्ण आहे । पीत केशर हे माजी तेथें ॥३॥ तयाचा मकरंद स्वरुप तें शुध्द । ब्रह्मादिका बोध हाची जाहला ॥४॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीप्रसादें । निजरुप गोविंदें जनीं पाहतां ॥५॥