भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाश गडगडी विद्युल्लता तळपती । अनिवार मेघ सणसणां वरुषती

akash gadagadi vidyullata talapati | anivar megh sanasanan varushati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आकाश गडगडी विद्युल्लता तळपती । अनिवार मेघ सणसणां वरुषती ॥१॥ राखियलें येणें देवकीनंदनें । गोपाळ म्ह-णती आमुचें कान्हे ॥२॥ गोवर्धनगिरी उचलोनी निजकरीं । राखिलें यापरी नामा म्हणे ॥३॥