भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकारिक नाम जीवानें ठेविलें । शिवानें तें केलें निर्विकल्प

akarik nam jivanen thevilen | shivanen ten kelen nirvikalpa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आकारिक नाम जीवानें ठेविलें । शिवानें तें केलें निर्विकल्प ॥१॥ जीव शिव दोन्ही विराले ज्यामाजीं । तें नाम सहजीं आद्य आहे ॥२॥ तया नामाविण जावयासी ठाव । नाहीं दुजा भाव तिळभरी ॥३॥ नामदेव म्हणे नाम घनदाट । प्रपंच निघोट नामापरी ॥४॥