भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकारी अर्धामात्रा कवण रीति दिसे

akari ardhamatra kavan riti dise

अकारी अर्धामात्रा कवण रीति दिसे । उकारीही घसे कवणे परी ॥१॥ मकारी संयुक्त झाली कैशापरी । अर्धमात्रेवरी अर्धमात्रा ॥२॥ अर्धमात्रेचा अर्थ अवचटची दिसे । गुरुगम्य सोय जाणती पैं ॥३॥ ज्ञानदेवें अर्थ शोधुनी घेतला । महाशून्यीं संचला निवृत्तीराज ॥४॥