भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकारेंवीण पाळणा पहुडलें

akarenvin palana pahudalen

आकारेंवीण पाळणा पहुडलें । निराकार म्हणोनि वोसणाईलें ॥१॥ जो जो जो जो बाळा निराकार पाळणा । व्योमीं व्योमाकारीं झोंप घेई ॥ध्रु०॥ चौदा नि:शब्दीं जागृत केलें । येकविसी हालवूनि बाळ उठविलें ॥२॥ बाप रखुमादेविवरु निजीं निजविलें । कांहीं नव्हे ऐसें कांहीं ना केलें ॥३॥