भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजिचा दिवस आम्हां सोनियाचा । गोवळू भेटला कान्हो नंदाचा

ajicha divas amhan soniyacha | govalu bhetala kanho nandacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आजिचा दिवस आम्हां सोनियाचा । गोवळू भेटला कान्हो नंदाचा ॥१॥ कान्होबा पेंढारी येईल यमुने । तयावीण मज घडी न गमे ॥२॥ सोळासहस्र गोपी म्हणती अगा जगज्जीवना । एके वेळीं भेटी देईं नंदनंदना ॥३॥ उजळुनी आरती करूं कुरवंडिया । शेष भरूं नाम्या स्वामी वनमाळिया ॥४॥