भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसियांचे चरित्र जो आवडी आईके । तो या भक्ताबरोबरी तुके

aisiyanche charitra jo avadi aike | to ya bhaktabarobari tuke

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसियांचे चरित्र जो आवडी आईके । तो या भक्ताबरोबरी तुके । भोगी वैकुंठींचीं निजसुखें । बोलिले मुखें श्रीविठठल ॥१॥ धन्य धन्य ते भक्त । ज्या कारणें श्री भगवंत । ऐसे पवाडे करित । विश्व उद्धरी तेणें करुनि ॥२॥ जे भाग्याचे होति । त्यासिच हे होय प्राप्ती । ते मागुते न येति पुनरावृत्ती । गर्भवासा ॥३॥ नामा म्हणे नामस्मरण । तुटचि प्रपंचधरण बंधन । सुख पावती निदान । समचरण देखलिया ॥४॥