भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशापरी पांडवांतें । रक्षियेलें दीनानाथें

aishapari pandavanten | rakshiyelen dinanathen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐशापरी पांडवांतें । रक्षियेलें दीनानाथें ॥१॥ शंखचक्र आयुधें करीं । छाया पितांबर करी ॥२॥ ह्स्त ठेऊनियां माथां । सुखी असा निर्भय चित्तां ॥३॥ आज्ञा घेउनी सर्वांची । देव गेले द्वारकेसी ॥४॥ सरला थालिपाक आतां । पुढें सावधान श्रोतां ॥५॥ कथा पुढील गहन । घोषयात्ना निरूपण ॥६॥ येथुनी अध्याय कळस । जनी म्हणे झाला रस ॥७॥