भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशा या पंक्ती टैंकर आनंदाचे देती

aisha ya pankti tainkar anandache deti

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐशा या पंक्ती टैंकर आनंदाचे देती।।१।। तृप्ति वागली सर्वांसी । तरी आवड अन्नापाशीं ॥२॥ उठले हात प्रक्षाळुनी। विडे घेतले सर्वांनी ॥ ३॥ न बैसवे सुखासनीं । अवघे प्रवर्तले शयनीं ।।४।। ते देखोनि निद्रिस्त । साही जणें झालीं गुप्त ।।५॥ माया निर्मियेली जैसी आतां गुप्त झाली तैसी ॥६॥ कोणा न कळे याची करणी म्हणे नामयाची जनी ॥७॥