भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें सांगतां माभळभटा । राया दचक बैसला मोठा । मग पाचारुनियां सुभटा । दैत्याप्रती काय बोले

aisen sangatan mabhalabhata | raya dachak baisala motha | mag pacharuniyan subhata | daityaprati kay bole

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसें सांगतां माभळभटा । राया दचक बैसला मोठा । मग पाचारुनियां सुभटा । दैत्याप्रती काय बोले ॥१॥ म्हणे वाढविलेंती बहुता मानें । अपार संपदा देऊनियां धनें । आजि माझिया उपेगा येणे । बाळ कृष्ण्‍ वधणें भलत्यापरी ॥२॥ नाना विदया तुमच्या अंगी । रुपे पालटुनी विचरतां जगी । मायारुपी म्हणऊनियां स्वर्गी । देवही भिती तुम्हांसी ॥३॥ ऐसें असोनि माझिये गांठी । कायसी बाळका जळुची गोठी । तुमचेनी बळें हे सकळही सुष्टी । आर्चित झाली मजलागीं ॥४॥ पूतना गेलीते तंव नारी । दुसरा भट तोहि भिकारी । काय जाणों कैशापरी । देखोनी कळली तयासी ॥५॥ तो तंव अंत्यंत सकुमार । सांगती अवघे लहान थोर । सुंदरपणाचीही बहार । रुपा आली कृष्णाकृती ॥६॥ तरी तुम्ही जाऊनियां तेथें । प्रेतरुपचि आणवा येथें । निळा म्हणे पाहोनियां त्यातें । करऊं अक्षवाणें अपणा ॥७॥